could have + Past Participle | क्रिया करू शकला असता
भूतकाळात न केलेली परंतु करणे शक्य असलेली गोष्ट could have + past participle (Verb3) या रचनेतून सांगितली जाते.
S + could have + Verb3 + O
क्रिया करू शकला असता
You have helped him. (Present Perfect Tense)
तू त्याला मदत केलेली आहेस.
हा Present Perfect Tense पूर्ण वर्तमानकाळ आहे.
या वाक्यात केवळ वस्तूस्थितीचे विधान करण्यात आले आहे.
या वाक्यात आहे ती रचना तशीच ठेवून फक्त You नंतर could घेतले की वाक्याचा अर्थ भूतकाळात न केलेली परंतु करणे शक्य असलेली गोष्ट could have + past participle (Verb3) या रचनेतून सांगितली जाते.
For example :
You could have helped him.
तू त्याला मदत करू शकला असतास, म्हणजे तू त्याला मदत करणे शक्य होते, परंतु ते करण्यात आले नाही, असा अर्थ या रचनेतून व्यक्त होतो.
Examples:
1. They have brought toys. (Present Perfect Tense)
त्यांनी खेळणी आणली आहेत.
They could have brought toys.
त्यांना खेळणी आणता आली असती.
ते खेळणी आणू शकले असते.
(मात्र खेळणी आणली नाहीत)
2. Anil has sold his bike. (Present Perfect Tense)
अनिलने त्याची बाईक विकली आहे.
Anil could have sold his bike.
अनिलला त्याची दुचाकी विकता आली असती.
अनिल त्याची दुचाकी विकू शकला असता.
(मात्र दुचाकी विकली नाही)
3. Suman has paid my bill. (Present Perfect Tense)
सुमनने माझे बिल भरलेले आहे.
Suman could have paid my bill.
सुमन माझे बिल भरू शकली असती.
(मात्र बिल भरले नाही.)
4. We have saved money. (Present Perfect Tense)
आम्ही पैसे वाचवलेले आहेत.
We could have saved money.
आम्ही पैसे वाचवू शकलो असतो.
(मात्र पैसे वाचवले नाहीत.)
5. I have counted these papers. (Present Perfect Tense)
मी हे पेपर मोजलेले आहेत.
I could have counted these papers.
मी हे पेपर मोजू शकलो असतो.
(मात्र पेपर मोजले नाहीत.)
6. They have cleaned this room. (Present Perfect Tense)
त्यांनी ही खोली स्वच्छ केलेली आहे.
They could have cleaned this room.
त्यांना ही खोली स्वच्छ करता आली असती.
ते ही खोली स्वच्छ करु शकले असते.
(मात्र खोली स्वच्छ केली नाही.)
0 Comments