Dialogue – Describing Your Home
A: You have never been to my house, right?तू कधीच माझ्या घरी आलेली नाहीस, बरोबर ना?
B: Yes, you invite me many times. But I couldn’t come till now. That’s why I’m really curious to know about your home.
हो, तू मला अनेक वेळा बोलावले आहेस. पण मी आत्तापर्यंत येऊ शकले नाही. म्हणूनच मला तुझ्या घराबद्दल खूप उत्सुकता आहे.
A: Well, my home is a bungalow in Pune, situated on 2 acres of land. It has two bedrooms, a small balcony, and a beautiful garden I created with flowers, plants, and fruits.
बरं, माझा पुण्यात एक बंगलो आहे, जो २ एकर जमिनीवर आहे. त्यात दोन बेडरूम आहेत, एक छोटी बाल्कनी आहे, आणि मी फुले, झाडे आणि फळे लावलेली सुंदर बाग देखील आहे.
B: Wow! That sounds amazing. You must really enjoy spending time in your garden.
वा! खूप छान वाटतंय. तुला नक्कीच तुझ्या बागेत वेळ घालवायला खूप मजा येते असेल.
A: Absolutely! I love spending evenings there. Plus, the railway station, hospital, and market are all very near to my house.
हो, नक्कीच! मला संध्याकाळी तिथे वेळ घालवायला खूप आवडते. शिवाय, रेल्वे स्थानक, रुग्णालय आणि बाजार सर्व माझ्या घराजवळ आहेत.
B: That’s so convenient! What do you like most about your home?
खूप सोयीचं आहे! तुला त्यातले सर्वात जास्त काय आवडते?
A: I love the balcony and the garden because I can relax there and enjoy fresh air while seeing my plants and fruits grow.
मला बाल्कनी आणि बाग खूप आवडते कारण मी तिथे आराम करू शकतो आणि माझी झाडे आणि फळे मोठी होताना बघून आनंद मिळतो.
B: Wonderful! Do you live close to your school too?
खूप छान! तुझे घर शाळेजवळच आहे का?
A: Yes, it’s just 10 minutes away. That makes it very convenient.
हो, फक्त १० मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे खूप सोयीचे होते.
B: Great! Your home sounds really comfortable and beautiful.
छान! तुझे घर खरंच आरामदायी आणि सुंदर वाटतंय.
A: Thanks! You must visit sometime, I’ll be happy to show you around.
धन्यवाद! तू कधीतरी नक्की ये, मला तुला घर दाखवायला आनंद होईल.
B: I’d love that. Let’s plan soon!
मलाही खूप आवडेल. आपण लवकरच प्लॅन करूया!
0 Comments