20 Daily-Use Sentences with Dough (पीठ)
1. Take 2 cups of wheat flour.
2 कप गव्हाचे पीठ घ्या.
2. Add a pinch of salt.
चिमूटभर मीठ घाला.
3. Add 1 teaspoon of oil.
1 चमचा तेल घाला.
4. Mix the flour, salt, and oil well.
पीठ, मीठ आणि तेल चांगले मिसळा.
5. Add water little by little.
थोडे थोडे पाणी घाला.
6. Knead the dough well.
पीठ चांगले मळा.
7. The dough is too dry.
पीठ खूप कोरडे आहे.
8. The dough is too sticky.
पीठ खूप चिकट आहे.
9. Add a little water to the dough.
पिठात थोडे पाणी घाला.
10. Add some flour to the dough.
पिठात थोडे पीठ घाला.
11. Knead the dough again.
पीठ पुन्हा मळा.
12. The dough is too hard.
पीठ खूप कडक आहे.
13. The dough is too soft.
पीठ खूप मऊ आहे.
14. The dough is smooth now.
पीठ आता मऊसर झाले आहे.
15. Cover the dough and let it rest.
पीठ झाकून थोडा वेळ ठेवून द्या.
16. The dough is ready.
पीठ तयार आहे.
17. Roll the dough into a ball.
पिठाचा गोळा करा.
18. Make small dough balls.
पिठाचे छोटे गोळे करा.
19. The dough is ready to use.
पीठ वापरण्यासाठी तयार आहे.
20. Now the dough is ready to make chapatis.
आता पोळ्या बनवण्यासाठी पीठ तयार आहे.

0 Comments