shall आणि will ही भविष्यकाळी क्रियापदे आहेत. एखादी क्रिया होईल का? ते माहिती करून
घेण्यासाठी Shall / Will + S + V1 + O + ? या फॉर्मुल्याचा वापर करावा.
I, We या सर्वनामांना घेऊन प्रश्न बनवण्यासाठी Shall ने प्रश्नाची सुरुवात करावी.
Shall + S + + V1 + O + ?
he, she, it, you, they या सर्वनामांना घेऊन व एकवचनी व अनेकवचनी नामांना घेऊन प्रश्न बनवताना
प्रश्नाची सुरुवात will ने करावी. सर्वसाधारणपणे प्रश्न बनवण्यासाठी will चा वापर जास्त केला जातो.
Simple Future Tense चा प्रश्न बनवण्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप (Verb1) घेतले जाते.
प्रश्नाची सुरूवात Will ने करावी.
Will नंतर noun (नाम)/ I, We, they, you, he, she, it ही सर्वनामे घ्यावीत.
नाम वा सर्वनामानंतर क्रियापदाचे पहिले रूप घ्यावे.
ज्या व्यक्तीला उद्देशून आपल्याला प्रश्न विचारायचा आहे त्या नाम वा सर्वनामाला Will नंतर घेवून
Simple Future Tense चे प्रश्न बनवावे.
Examples:
Will you play chess with me? तू माझ्याबरोबर बुद्धीबळ खेळशील का?
Will you bring chocolates? तू चॉकलेटस आणशील का?
Shall we eat out today? आज आपण बाहेर जेवायचे का?
Shall I drop you at the station? मी तुला स्टेशनवर सोडू का?
Shall we leave now? आता आपण निघायचे का?
Shall I buy this book? मी हे पुस्तक विकत घेऊ का?
Will she meet you tomorrow? उदया ती तुला भेटणार का?
Will he learn French language? तो फ्रेंच भाषा शिकणार का?
Will Rukar go to Dadar by Ola cab? रुकर ओला टॅक्सीने दादरला जाणार का?
Will you reserve two seats seats for us? तू आमच्यासाठी दोन जागा राखून ठेवशील का?
Will you have dosa for breakfast? तू नाश्त्याला डोसा खाशील का?
Will they take part in essay writing competition? ते निबंध लेखन स्पर्धेत भाग घेतील का?
Will you reach there by 6pm? तू तेथे संध्याकाळी सहापर्यंत पोहोचशील का?
Will they stay herefor two days? ते इथे दोन दिवस राहतील का?
Will you send it by courier? तू हे कुरिअरने पाठवशील का?
Will you wait for me? तुम्ही माझी वाट पहाल का?
Will you come tomorrow? तू उद्या येशील का?
Will she finish the work in time? ती वेळेत ते काम पूर्ण करेल का?
Will you do this? तू हे करशील का?
Will you pay my school fees? तू माझी शाळेची फी भरशील का?
Will Rashi draw the rangoli ? रिद्धी रांगोळी काढेल काय?
Will you e-mail me about it? तू मला याबाबतीत ईमेल करशील का?
Will you have lunch with me? तू माझ्यासोबत दुपारचे जेवण कराल का?
Will you come into my cabin? तुम्ही माझ्या केबिनमध्ये याल का?
Will you have juice? तुम्ही ज्यूस घ्याल का?
Will you turn off the lights? तू दिवे बंद करशील का?
0 Comments