Subscribe Us

POSITIVE DEGREE - 3

No other girl is as beautiful as Vaijayanti is.

दुसरी कोणतीही मुलगी वैजयंती इतकी सुंदर नाही.

वाक्याची सुरुवात दुसरे कोणीही नाही या अर्थाने No other ने करून घ्यायची आहे. No other नंतर वैजयंती ही मुलगी असल्याने तिची तुलना इतर मुलींसोबत केली आहे. म्हणून no other नंतर girl हे एकवचनी जातीवाचक नाम घ्यायचे आहे. girl हे एकवचनी असल्याने व वर्तमानकाळात बोलायचे असल्याने is हे क्रियापद घ्यायचे आहे. is नंतर च्या इतकी सुंदर या अर्थाने as beautiful as घेवून शेवटी सर्व मुलींची तुलना Vaijayanti सोबत केल्याने Vaijayanti is घ्यायचे आहे. या वाक्यातून दुसरी कोणतीही मुलगी वैजयंती इतकी सुंदर नाही असे सांगितले आहे.

त्याच्यासारखे दुसरे कोणीही नाही असे सांगायचे असते तेव्हा No other ने सुरुवात करून ती व्यक्ती प्राणी पक्षी, वस्तू, ठिकाण, शहर, गाव, देश, खंड ज्या गटात मोडते त्याचे एकवचनी रूप घ्यावे. जसे अनिकेत हा मुलगा आहे म्हणून No other नंतर boy घ्यावे. Nachita ही मुलगी आहे म्हणून No other नंतर girl घ्यावे. Mahabaleshwar हे ठिकाण असल्याने No other नंतर place घ्यावे. Mumbai हे शहर असल्याने No other नंतर city घ्यावे. India हा देश असल्याने No other नंतर country घ्यावे. Yamuna ही नदी असल्याने No other नंतर river घ्यावे. इथे लक्षात घ्या मुलाची तुलना मुलांशीच होणार. मुलीची तुलना मुलीशीच होणार. एका ठिकाणची तुलना इतर ठिकाणांशीच होणार, एका शहराची तुलना इतर शहरांशीच होणार , एका देशाची तुलना इतर देशांशीच होणार, म्हणून ज्यांची तुलना आपल्याला करायची आहे त्या जातीवाचक नामाचा उल्लेख No other नंतर करावा लागतो. व जे जातीवाचक नाम आपण घेणार आहोत ते एकवचनी घ्यावे. 

No other नंतर घेतलेल्या जातीवाचक नामांनतर व्यक्ती असेल तर तिची तुलना class, school, area, society, bank, post office, village, city, state, country इत्यादींशी केलेली असेल त्यांना गरजेनुसार घ्यावे. जसे in the class, in the school, in the area, in the society, in the bank, in the post office, in the village, in the city, in the state, in the country घ्यावे. river असेल तर in the village, in the city, in the country, in the continent घ्यावे. city असेल तर in india, in the state, in the country, in the world, in the continent घ्यावे, व त्यानंतर काळानुसार योग्य सहाय्यकारी क्रियापद घ्यावे.

Post a Comment

0 Comments