'We'
एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी We (आम्ही|आपण ) हे सर्वनाम घेतले जाते.
बोलणाऱ्या व्यक्ती स्वतः बद्दल बोलताना We या सर्वनामाचा वापर करतात.
We हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे.
be (बी) - असणे | are हे क्रियापद असून ते to be चे वर्तमानकाळी रुप आहे.
वर्तमानकाळात We या कर्त्याबरोबर 'be' या क्रियापदाचे are हे रुप घेतले जाते.
We are lawyers. आम्ही वकील आहोत. We are leaders. आम्ही नेते आहोत.
We are magicians. आम्ही जादूगार आहोत. We are masons. आम्ही गवंडी आहोत.
We are merchants. आम्ही व्यापारी आहोत. We are milkmen. आम्ही गवळी आहोत.
We are friends. आम्ही मैत्रिणी आहोत. We are musicians. आम्ही संगीतकार आहोत.
We are managers. आम्ही व्यवस्थापक आहोत. We are nurses. आम्ही परिचारिका आहोत.
We are newspaper sellers. आम्ही वर्तमानपत्र विक्रेता आहोत. We are pilots. आम्ही वैमानिक आहोत.
We are painters. आम्ही रंगारी आहोत. We are patients. आम्ही रुग्ण आहोत.
We are pedlars. आम्ही किरकोळ विक्रेते आहोत. We are peons. आम्ही शिपाई आहोत.
We are players. आम्ही खेळाडू आहोत. We are psychiatrists. आम्ही मानसोपचारतज्ज्ञ आहोत.
We are psychologists. आम्ही मानसशास्त्रज्ञ आहोत. We are postmen. आम्ही पोष्टमन आहोत.
We are publishers. आम्ही प्रकाशक आहोत. We are good readers. आम्ही चांगले वाचक आहोत.
We are receipt jinista. आम्ही स्वागतिका आहोत. We are sailors. आम्ही खलाशी आहोत.
We are scientists. आम्ही वैज्ञानिक आहोत. We are security guards. आम्ही सुरक्षा रक्षक आहोत.
We are servant. आम्ही नोकर आहोत. We are shopkeepers. आम्ही दुकानदार आहोत.
We are soldiers. आम्ही सैनिक आहोत. We are social workers. आम्ही समाज सेवक आहोत.
We are students. आम्ही विद्यार्थी आहोत. We are sweepers. आम्ही सफाई कामगार आहोत.
We are tailors. आम्ही शिंपी आहोत. We are teachers. आम्ही शिक्षक आहोत.
We are tourists. आम्ही पर्यटक आहोत. We are treasurers. आम्ही खजिनदार आहोत.
We are vegetable sellers. आम्ही भाजी विक्रेते आहोत. We are vendors. आम्ही विक्रेते आहोत.
We are watchmen. आम्ही पहारेकरी आहोत. We are weavers. आम्ही विणकर आहोत.
We are writers. आम्ही लेखक आहोत. We are yoga teachers. आम्ही शिक्षक आहोत.
We are engineers. आम्ही अभियंते आहोत. We are actors. आम्ही अभिनेते आहोत.
We are actresses. आम्ही अभिनेत्र्या आहोत. We are authors. आम्ही लेखक आहोत.
We are architects. आम्ही स्थापत्य रचनाकार आहोत. We are artists. आम्ही कलाकार आहोत.
We are dancers. आम्ही नृत्यांगना आहोत. We are editors. आम्ही संपादक आहोत.
We are ten years old. आम्ही दहा वर्षांचेे आहोत. We are small. आम्ही लहान आहोत.
We are tall. आम्ही उंच आहोत. We are handsome. आम्ही देखणे आहोत.
We are beautiful. आम्ही सुंदर आहोत. We are shy. आम्ही लाजाळू आहोत.
We are bold. आम्ही धीट आहोत. We are very active. आम्ही खूप कृतीशील आहोत.
We are very lazy. आम्ही खूप आळशी आहोत. We are very kind. आम्ही खूप दयाळू आहोत.
We are very punctual. आम्ही खूप वक्तशीर आहोत. We are sensitive. आम्ही संवेदनशील आहोत.
We are short-tempered.आम्ही शीघ्रकोपी आहोत.We are narrow-minded.आम्ही संकुचित मनाचे आहोत.
We are very simple. आम्ही खूप साधे आहोत. We are upset. आम्ही नाराज आहोत.
We are tired. आम्ही थकलेल्या आहोत. We are disturbed. आम्ही बैचेन आहोत.
We are on the first floor. आम्ही पहिल्या मजल्यावर आहोत. We are in the garden. आम्ही बगिच्यामध्ये आहोत.
We are in the classroom. आम्ही वर्गामध्ये आहोत. We are behind the door. आम्ही दरवाजाच्या पाठी आहोत.
We are on the terrace. आम्ही टेरेसवर आहोत. We are his sisters. आम्ही त्याच्या बहीणी आहोत.
We are her daughters. आम्ही तिच्या मुली आहोत. We are his brothers. आम्ही त्याचे भाऊ आहोत.
We are his friends. आम्ही त्याच्या मैत्रिणी आहोत. We are her neighbours. आम्ही तिच्या शेजारणी आहोत.
We are her teachers. आम्ही तिच्या शिक्षिका आहोत. We are his classmates. आम्ही त्याचे वर्गमित्र आहोत.
We are your aunts. आम्ही तुझ्या मावशा आहोत. We are busy now. आम्ही आता व्यस्त आहोत.
0 Comments