Subscribe Us

VERBS THAT STARTS WITH ''A' - 3

analyse - विश्लेषण करणे

You must analyse the causes of your defeat in the sports.

खेळातील तुमच्या पराभवाच्या कारणांचे तुम्ही विश्लेषण केले पाहिजे.

announce घोषणा करणे, जाहीर करणे

Rane uncle announced the result of the essay competition.

राणे काकांनी निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर केला.

arrest - अटक करणे

Some society members arrested the thief. काही सोसायटी सदस्यांनी चोरट्याला पकडले.

arrive - आगमन होणे

The guests arrived in Mumbai at 5 pm. सायंकाळी पाच वाजता पाहुणे मुंबईत दाखल झाले.

ask - विचारणे 

Runal asked me many questions. रुनलने मला अनेक प्रश्न विचारले.

assemble - एकत्र करणे, एकत्र जमणे

We assembled in the auditorium at 9 am. सकाळी ९ वाजता आम्ही सभागृहात जमलो.

assist - मदत करणे

May I assist you, please? कृपया मी तुम्हाला मदत करू का?

assume - गृहीत धरणे

assumed she wanted me to join her birthday party.

मी तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी व्हावे अशी तिची इच्छा आहे असे मी गृहित धरले.

assure - खात्री देणे

Mummy, I assure you I shall study hard and get 90% in the first semester exam.

मम्मी, मी तुला खात्री देतो की मी खूप अभ्यास करेन आणि पहिल्या सत्राच्या परीक्षेत 90% मिळवेन.

attach - संलग्न करणे, जोडणे

Photo copies of the adhar card, pan card and bank passbook are attached with form number 6.

आधार कार्ड, पॅनकार्ड आणि बँक पासबुकच्या फोटो प्रती फॉर्म क्रमांक 6 सोबत जोडल्या आहेत.

attack - हल्ला करणे

That beggar attacked on that person. त्या भिकाऱ्याने त्या व्यक्तीवर हल्ला केला.

attain - गाठणे, प्राप्त करणे

Devika attained B grade in Elementary grade drawing exam.

देविकाने एलिमेंटरी ग्रेड ड्रॉइंग परीक्षेत बी ग्रेड मिळवली.

attract - आकर्षित करणे, वेधणे

Her new saree attracted our attention. तिच्या नवीन साडीने आमचे लक्ष वेधून घेतले.


 

Post a Comment

0 Comments