VERBS THAT STARTS WITH ''A'
accept स्वीकारणे
Please accept this invitation. कृपया हे आमंत्रण स्वीकारा.
Do I have to pay in cash or will you accept my cheque?
मला रोख पैसे द्यावे लागतील की तुम्ही माझा चेक स्वीकाराल?
accomodate सामावून घेणे
During the conference you will be accommodated in a nearby hotel.
कॉन्फरन्स दरम्यान तुम्हाला जवळच्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली जाईल.
accompany - सोबत जाणे
My mother accompanied me to the doctor. माझी आई माझ्यासोबत डॉक्टरांकडे गेली.
accomplish - पूर्ण करणे
My daughter worked hard to accomplish the project.
माझ्या मुलीने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली.
accumulate जमा करणे
Over the years I have accumulated thousands of novels.
गेल्या काही वर्षांत माझ्याकडे हजारो कादंबऱ्या जमा झाल्या आहेत.
Dust soon accumulates if you don't clean this room for a week or so.
तू ही खोली आठवडाभर स्वच्छ न केल्यास लवकरच धूळ साचते.
accuse आरोप करणे
I accused him of hiding my book. मी त्याच्यावर पुस्तक लपवल्याचा आरोप केला.
She was accused of cheating. तिच्यावर फसवणूक केल्याचा आरोप होता.
accustom सवय होणे
It took me a while to accustom myself to studying nights.
रात्रीच्या अभ्यासाची सवय व्हायला मला थोडा वेळ लागला.
It took me a while to accustom myself to travelling by train.
मला ट्रेनने प्रवास करण्याची सवय व्हायला थोडा वेळ लागला.
ache वेदना होणे
My hands ached after doing dishes. भांडी घासल्यावर माझे हात दुखत होते.
achieve साध्य करणे
Rutvik has achieved a lot in a short time. रुत्विकने अल्पावधीत खूप काही साध्य केले आहे.
0 Comments