Vaidehi is as lazy as Kavya. वैदेही काव्या इतकी आळशी आहे.
या वाक्यातून वैदेही व काव्या दोघीही आळशी आहेत असे आपण सांगतो. म्हणजे दोघींचा आळशीपणा हा विशेष सारखाच आहे. म्हणून आपण as lazy as घेतले आहे. मात्र वैदेही काव्या एवढी आळशी नाही असे जर आपल्याला सांगायचे असेल तर not as lazy as घ्यावे. म्हणजेच पहिल्या as पूर्वी फक्त not घ्यायचे आहे. म्हणजे आपले Vaidehi is not as lazy as Kavya. वैदेही काव्या इतकी आळशी नाही आहे. असे वाक्य तयार होईल.
Sanskar is as clever as Akshay. संस्कार अक्षय इतका हुशार आहे.
या वाक्यातून संस्कार व अक्षय दोघेही हुशार आहेत असे आपण सांगतो. म्हणजे दोघांचा हुशारी हा विशेष सारखाच आहे. म्हणून आपण as clever as घेतले आहे. मात्र संस्कार अक्षय इतका हुशार नाही असे जर आपल्याला सांगायचे असेल तर not as clever as घ्यावे. म्हणजेच पहिल्या as पूर्वी फक्त not घ्यायचे आहे. म्हणजे आपले Sanskar is not as clever as Akshay. संस्कार अक्षय इतका हुशार नाही आहे. असे वाक्य तयार होईल.
Vaidehi is as beautiful as Shanti. वैदेही शांती इतकी सुंदर आहे.
या वाक्यातून वैदेही व शांती दोघीही सुंदर आहेत असे आपण सांगतो. म्हणजे दोघी सारख्याच सुंदर आहेत. म्हणून आपण as beautiful as घेतले आहे.
मात्र वैदेही शांती इतकी सुंदर नाही असे जर आपल्याला सांगायचे असेल तर not as beautiful as घ्यावे. म्हणजेच पहिल्या as पूर्वी फक्त not घ्यायचे आहे. म्हणजे आपले Vaidehi is not as beautiful as Shanti. वैदेही शांती इतकी सुंदर नाही आहे. असे वाक्य तयार होईल.
0 Comments