Subscribe Us

POSITIVE DEGREE - 4

जेव्हा आपल्याला अत्यंत मोजक्या म्हणजेच फारच थोड्याच व्यक्ती प्राणी वस्तू शहरे ठिकाणे देश खेळाडू गायक इत्यादींबरोबर तुलना करायची असते तेव्हा वाक्याची सुरुवात फारच थोड्या या अर्थाने Very few ने करावी. Very few नंतर ज्यांच्याशी तुलना करायची आहे त्या जातीवाचक नामाचे अनेकवचनी रूप घ्यावे. जसे की जीच्याबरोबर तुलना करायची आहे ती मुलगी असेल तर Very few नंतर girls हे अनेकवचनी जातीवाचक नाम घ्यावे. त्या मुलीनचा ज्या वर्ग, शाळा, area, society, गाव, शहर, देश, इत्यादींशी संबंधित उल्लेख केला असेल ते girls सोबत घ्यावे. ज्याच्याबरोबर तुलना करायची आहे तो मुलगा असेल तर Very few नंतर boys हे अनेकवचनी जातीवाचक नाम घ्यावे. व ज्या वर्ग, शाळा, society, area, गाव शहर, देश, इत्यादींशी संबंधित उल्लेख केला असेल ते boys सोबत घ्यावे.

 जिच्याबरोबर तुलना करायची आहे ती city असेल तर Very few नंतर cities हे अनेकवचनी जातीवाचक नाम घ्यावे.ज्या गाव, शहर, देश, इत्यादींशी संबंधित उल्लेख केला असेल ते cities सोबत घ्यावे. जीच्याबरोबर तुलना करायची आहे ती river असेल तर Very few नंतर rivers हे अनेकवचनी जातीवाचक नाम घ्यावे. ज्या ठिकाण, गाव, शहर, देश, इत्यादींशी संबंधित उल्लेख केला असेल ते rivers सोबत घ्यावे. ज्याच्याबरोबर तुलना करायची आहे तो singer असेल तर Very few नंतर singers हे अनेकवचनी जातीवाचक नाम घ्यावे. ज्या class, school, city, area, village, city, country, इत्यादींशी संबंधित उल्लेख केला असेल ते singers सोबत घ्यावे. very few मधून अनेक जणांचा उल्लेख होतो व very few नंतर जातीवाचक नाम आपण घेणार आहोत ते अनेकवचनी असल्याने वर्तमानकाळात बोलायचे असेल तर are हे सहाय्यकारी क्रियापद व भूतकाळात बोलायचे असेल तर were हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे.

त्यानंतर as ला घेवून as + मूळ रूपात adjective + as घ्यावे. व त्यानंतर ज्याच्याबरोबर तुलना करायची आहे त्याला एकवचनी सहाय्यकारी क्रियपदासोबत घ्यावे. 

जसे Very few girls in our society are as active as Nisha is.

आमच्या सोसायटी मधील काही थोड्याच मुली निशा इतक्या चपळ आहेत. इथे पहा आपण Very few नंतर girls हे अनेकवचनी जातीवाचक नाम घेतले आहे. त्यानंतर आमच्या society मधील मुलींची तुलना केल्याने girls in our society घेवून त्यानंतर are हे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला वर्तमानकाळात बोलायचे असल्याने घेतले आहे. त्यानंतर च्या इतक्या चपळ या अर्थाने as active as घेवून शेवटी ज्या मोजक्या मुलींशी तुलना जिच्याबरोबर केली आहे त्या निशाला is ह्या सहाय्यकारी क्रियापदासोबत घेतले आहे.

No other व Very few ची रचना सारखीच आहे फक्त No other नंतर एकवचनी जातीवाचक नाम घ्यावे लागते व Very few नंतर अनेकवचनी जातीवाचक नाम घ्यावे लागते. No other मधून ज्याच्याबरोबर तुलना करायची आहे त्याच्यासारखे दुसरे कोणीही नाही असे सांगितले जाते. म्हणजे ते एकच तसे आहे असे आपण सांगू शकतो. very few मधून ज्यांची तुलना आपण करतोय त्या थोड्याच गोष्टी आहेत. म्हणजेच विशेष बाब असलेली ती एकच व्यक्ती, प्राणी, पक्षी, वस्तू, शहर, ठिकाण, देश इत्यादी नाही तर अजूनही तसे वैशिष्ट्य असलेल्या व्यक्ती, प्राणी, पक्षी, वस्तू, शहर, ठिकाण, देश इत्यादी गोष्टी आहेत त्यातील ही एक आहे म्हणून very few घ्यावे लागते.

आता ही वाक्ये पाहा. No other boy in the class is as lazy as Darshan is. त्या वर्गातील दुसरा कोणताही मुलगा दर्शन इतका आळशी नाही.

Very few boys in the class are as lazy as Darshan is. फारच थोडे मुलगे दर्शन इतके आळशी आहेत. इथे पहा आपण फक्त No other च्या जागी Very few घेतले आहे. इथे boy हे एकवचनी जातिवाचक नाम असल्याने is आहे v इथे boys हे अनेकवचनी जातिवाचक नाम असल्याने are आहे. बाकी रचना same आहे.

Post a Comment

0 Comments