Subscribe Us

POSITIVE DEGREE - 5

क्रियाविशेषणाच्या साहाय्याने क्रियेची तुलना केली जाते.

जसे Trusha runs as fast as Karish. तृषा करिष इतकीच जलद धावते.

इथे पहा run या क्रियापदाबद्धल अधिक माहिती देणारे fast हे क्रियाविशेषण घेतले आहे.

हेच वाक्य जर आपल्याला तृषा करिष इतकी जलद धावत नाही असे सांगायचे असेल तर नकार दाखवण्यासाठी does not run घ्यायचे आहे.

इथे runs या क्रियापदामध्ये does लपलेला असतो.

आपल्याला जर तृषा करिष इतकीच जलद धावली असे सांगायचे असेल तर run चे भूतकाळी दुसरे रूप ran घ्यायचे आहे. Trusha ran as fast as Karish.

तृषा करिष इतकीच जलद धावली. हेच वाक्य जर आपल्याला तृषा करिष इतकी जलद धावली नाही असे सांगायचे असेल तर नकार दाखवण्यासाठी did not run घ्यायचे आहे.

Trusha did not run as fast as Karish. तृषा करिष इतकी जलद धावली नाही.




Post a Comment

0 Comments