Though/Although म्हणजे जरी....तरी.
दोन विरुद्ध गोष्टी सांगायच्या असतील म्हणजेच दोन गोष्टींतील विरोधाभास सांगायचा असतो तेव्हा वाक्याच्या सुरूवातीला Though वा Although ला घ्यावे.
जसे I am tired. मी थकले आहे. I am washing these clothes now. मी आता हे कपडे धुत आहे.
या दोन्ही विरोधाभास दाखवणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजेच एका बाजुला मी थकले आहे असे मला सांगायचे आहे व दुसऱ्या बाजूला आता मी कपडे धूत आहे असे सांगायचे आहे. म्हणजेच या दोन्ही गोष्टींचा संबंध एकमेकांशी जोडून समोरच्या व्यक्तीला सांगायचे आहे. वाक्याच्या सुरुवातीला Though घ्या वा Although घ्या दोघांचा अर्थ एकच आहे. आता वाक्याच्या सुरुवातीला Though ला घेतल्यावर वाक्यांचा अर्थ काय होतो ते पाहूया.
Though I am tired, I am washing these clothes now.
जरी मी थकले आहे तरी मी आता हे कपडे धूत आहे.
यासारख्या परस्पर विरोधी गोष्टी आपण नेहेमीच बोलत असतो.
I am sick. मी आजारी आहे. I have to cook now. आता मला जेवण बनवायचे आहे.
इथे I am sick. मी आजारी आहे. व I have to cook now. आता मला जेवण बनवायचे आहे. या दोन वाक्याना but म्हणजे परंतु ने जोडले आहे. मी आजारी आहे परंतु आता मला जेवण बनवायचे आहे. असा या वाक्याचा अर्थ आहे. मात्र जर मला समोरच्या व्यक्तीला जरी मी आजारी आहे तरी मला जेवण बनवायचे आहे असे सांगायचे असेल तर I am sick च्या पूर्वी म्हणजेच वाक्याच्या सुरुवातीला फक्त Though घ्यायचे आहे व या दोन वाक्यांच्यामध्ये असलेल्या but ला काढून but च्या जागी comma घ्यायचा आहे.
आता आपले Though I am sick, I have to cook now. जरी मी आजारी आहे तरी आता मला जेवण बनवायचे आहे हे वाक्य तयार झाले आहे.
इथे एक गोष्ट लक्षात ठेवा परीक्षेसाठी दिलेल्या वाक्याच्या सुरूवातीला Though वा Although ला घेवून वाक्यातील but ला काढून but च्या जागी comma घ्यावा लागतो.
Reema is very beautiful. रिमा खूप सुंदर आहे. She is very lazy. ती खूप आळशी आहे. ही दोन्ही वाक्ये स्वतंत्र आहेत. but ने जोडलेली नाहीत. समोरच्या व्यक्तीला सांगताना या दोन्ही वाक्यांचा संबंध जोडून रीमा खूप सुंदर आहे असे आपल्याला सांगायचे आहे तसेच ती खूप आळशी आहे असेही सांगायचे आहे. जरी रीमा खूप सुंदर आहे तरी ती कशी आहे? ती खूप आळशी आहे असे आपल्याला सांगायचे आहे. म्हणून आपण वाक्याच्या सुरुवातीला Though घेवून Though Reema is very beautiful, she is very lazy. जरी रीमा खूप सुंदर आहे तरी ती खूप आळशी आहे. हे वाक्य तयार केले आहे.
Examples:
She has a laptop but she doesn't use it. (but)
तिच्याजवळ लॅपटॉप आहे परंतु ती त्याचा वापर करत नाही.
Though she has a laptop, she doesn't use it.
जरी तिच्याजवळ लॅपटॉप आहे तरी ती त्याचा वापर करत नाही.
Neena has money but she won't pay the gas bill. (but)
नीना जवळ पैसे आहेत परंतु ती गॅस बील भरणार नाही.
Though Neena has money, she won't pay the gas bill.
जरी नीना जवळ पैसे आहेत तरी ती गॅस बील भरणार नाही.
She has a bike but she goes to the market on foot. (but)
तिच्याजवळ एक बाईक आहे परंतु ती बाजारात पायी जाते.
Though she has a bike, she goes to the market on foot.
जरी तिच्याजवळ एक बाईक आहे, तरी ती बाजारात पायी जाते.
I wish to buy a scooty but I don't have enough money. (but)
मला एक स्कूटी विकत घ्यायची इच्छा आहे परंतु माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत.
Though I wish to buy a scooty, I don't have enough money.
जरी मला एक स्कूटी विकत घेण्याची इच्छा आहे तरी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत.
I need to complete my homework but I don't have enough time.(but)
मला माझा गृहपाठ पूर्ण करायची गरज आहे परंतु माझ्याकडे पुरेसा वेळ नाही.
Though I need to complete my homework, I don't have enough time.
जरी मला माझा गृहपाठ पूर्ण करायची गरज आहे तरी माझ्याकडे पुरेसा वेळ नाही.
Harsha is rich. She is miser. हर्षा श्रीमंत आहे. ती कंजुष आहे.
Though Harsha is rich, she is miser. जरी हर्षा श्रीमंत आहे तरी ती कंजुष आहे.
He is rich. He is helpful. तो श्रीमंत आहे. तो मदत करणारा आहे.
Though he is rich, he is helpful. जरी तो श्रीमंत आहे तरी तो मदत करणारा आहे.
0 Comments