Where? कोठे?
We use 'Where' if we want to know the place.
🟥 They sat in the garden. ते बागेत बसले.
Where did they sit? ते कोठे बसले?
🟥 Krivi told her the story in the train. क्रिवीने तिला ट्रेनमध्ये गोष्ट सांगितली.
Where did Krivi tell her the story? क्रिवीने तिला गोष्ट कोठे सांगितली?
🟥 Nihar gave you the books at the college. निहरने तुला कॉलेजमध्ये पुस्तके दिली.
Where did Nihar give you the books? निहरने तुला पुस्तके कोठे दिली?
🟥 Urmi did her homework in the school. उर्मीने तिचा गृहपाठ शाळेत केला.
Where did Urmi do her homework? उर्मीने तिचा गृहपाठ कोठे केला?
🟥 Griva stopped her car in the middle of the street.
ग्रिवाने तिची कार रस्त्याच्या मधोमध थांबवली.
Where did Griva stop her car? ग्रिवाने तिची कार कोठे थांबवली?
🟥 Netra puts her dresses in the cupboard. नेत्रा तिचे कपडे कपाटामध्ये ठेवते.
Where does Netra put her dresses? नेत्रा तिचे कपडे कोठे ठेवते?
🟥 Arya met her teachers at the railway station.
आर्या तिच्या शिक्षकांना रेल्वेस्टेशनला भेटली.
Where did Arya meet her teachers? आर्या तिच्या शिक्षकांना कोठे भेटली?
🟥 Varsha stood between Neha and Rani. वर्षा नेहा आणि राणीच्या मध्ये उभी राहिली.
Where did Varsha stand? वर्षा कोठे उभी राहिली?
0 Comments