When? केव्हा?
We use 'When' if we want to know the time. वेळ जाणून घ्यायची असेल तर आपण 'When' वापरतो.
🟥 Rachana went to the bank at 1 o'clock yesterday. रचना काल 1 वाजता बँकेत गेली.
When did Rachana go to the bank yesterday? रचना काल बँकेत केव्हा गेली?
🟥 Reema lost her umbrella in the morning. सकाळी रिमाने छत्री हरवली.
When did Reema lose her umbrella? रिमाने छत्री केव्हा हरवली?
🟥 Aish read four answers during breakfast. ऐशने नाश्ता करताना चार उत्तरे वाचली.
When did Aish read four answers? ऐशने चार उत्तरे केव्हा वाचली?
🟥 Mihir found his mobile an hour ago. मिहीरला तासाभरापूर्वी त्याचा मोबाईल सापडला.
When did Mihir find his mobile? मिहीरला त्याचा मोबाईल केव्हा सापडला?
🟥 Reha goes to school at 6.30 am. रेहा सकाळी 6.30 ला शाळेत जाते.
When does Reha go to school? रेहा शाळेत केव्हा जाते?
🟥 Triya broke the chair on Friday. त्रियाने शुक्रवारी खुर्ची मोडली.
When did Triya break the chair? त्रियाने खुर्ची केव्हा मोडली?
🟥 Neena was buying icecreams in the evening. नीना संध्याकाळी आईस्क्रीम विकत घेत होती.
When was Neena buying icecreams? नीना आईस्क्रीम केव्हा विकत घेत होती?
🟥 Priya kept her mobile on the table last night. प्रियाने काल रात्री तिचा मोबाईल टेबलावर ठेवला होता.
When did Priya keep her mobile on the table? प्रियाने तिचा मोबाईल टेबलावर केव्हा ठेवला होता?
🟥 Triva and Tullu did their shopping yesterday. त्रिवा आणि तुल्लू यांनी काल त्यांची खरेदी केली.
When did Triva and Tullu do their shopping? त्रिवा आणि तुल्लू यांनी त्यांची खरेदी केव्हा केली?
0 Comments