Subscribe Us

A LITTLE - A FEW

A little means a small quantity of

A little म्हणजे लहान प्रमाणात

It is used with uncountable nouns like water, petrol, diesel, oil, juice, milk, buttermilk, wheat, sugar, rice, honey, jam, etc.

हे पाणी, पेट्रोल, डिझेल, तेल, रस, दूध, ताक, गहू, साखर, तांदूळ, मध, जाम, इत्यादी यांसारख्या संख्येत मोजता न येणाऱ्या नामांसह वापरले जाते.

Examples:

How much coconut water do you take?

तू किती नारळ पाणी घेतेस?

I often take a little coconut water.

मी अनेकदा थोडे नारळ पाणी घेते.

How much jam is there in the jar?

जार मध्ये किती जाम आहे?

There is a little jam in the jar.

जार मध्ये थोडा जाम आहे.

How much butter will you need for pavbhaji?

पावभाजीसाठी तुला किती बटर लागेल?

I will need a little butter for pavbhaji. पावभाजीसाठी मला थोडे बटर लागेल.

How much milk is there in the fridge? फ्रीजमध्ये किती दूध आहे?

There is a little milk in the fridge.

फ्रीजमध्ये थोडे दूध आहे.

How much butter do you need everyday?

तुला रोज किती बटर लागते?

I need a little butter every day.

मला रोज थोडे बटर लागते.

How much sugar is there in the jar?

बरणीत किती साखर आहे?

There is a little sugar in the jar.

बरणीत थोडी साखर आहे.

How much petrol is there in your bike?

तुझ्या बाईकमध्ये किती पेट्रोल आहे?

There is a little petrol in my bike.

माझ्या बाईकमध्ये थोडे पेट्रोल आहे.

How much milk do you need to make coffee?

कॉफी बनवण्यासाठी तुला किती दुधाची गरज आहे?

I need a little milk to make coffee.

मला कॉफी बनवण्यासाठी थोडे दूध हवे आहे.

How much orange juice does your mother take everyday?

तुझी आई रोज किती संत्र्याचा रस घेते?

My mother takes a little orange juice everyday.

माझी आई रोज थोडा संत्र्याचा रस घेते.

How much water was there in the tank?

टाकीत किती पाणी होते?

There was a little water in the tank.

टाकीत थोडे पाणी होते.

How much jam did you spread on the chapati?

चपातीवर किती जाम पसरलास?

I spread a little jam on the chapatti.

मी चपातीवर थोडा जाम पसरवला.

A few means a small number of

A few म्हणजे एक लहान संख्या

It is used with countable plural nouns like pen, pencils, bike, rooms, schools, pillows, windows, mobiles, etc.

हे पेन, पेन्सिल, बाईक, खोल्या, शाळा, उशा, खिडक्या, मोबाईल यांसारख्या संख्येत मोजता येणाऱ्या अनेकवचनी नामांसह वापरले जाते.

Examples:

How many bikes do you have?

तुमच्याकडे किती बाईक्स आहेत?

I have a few bikes.

आमच्याकडे काही बाईक्स आहेत.

How many Lic policies does he sell everyday?

तो दररोज किती एलआयसी पॉलिसी विकतो?

He sells a few Lic policies everyday. 

तो दररोज काही एलआयसी पॉलिसी विकतो.

How many guavas does she want?

तिला किती पेरू हवे आहेत?

She wants a few guavas.

तिला काही पेरू हवे आहेत.

How many kilometres do you walk everyday?

तुम्ही रोज किती किलोमीटर चालता?

I walk a few kilometres everyday.

मी रोज काही किलोमीटर चालतो.

How many dresses does the tailor stitch every month?

शिंपी दर महिन्याला किती कपडे शिवतो?

The tailor stitches a few dresses every month.

शिंपी दर महिन्याला काही कपडे शिवतो.

How many movies did you watch last month?

गेल्या महिन्यात तुम्ही किती चित्रपट पाहिले?

I watched a few movies last month.

मी गेल्या महिन्यात काही चित्रपट पाहिले.

How many vadapavs did she tell you to bring?

तिने तुला किती वडापाव आणायला सांगितले?

She told me to bring a few vadapavs.

तिने मला काही वडापाव आणायला सांगितले.

How many chocolates can you give me today?

आज तुम्ही मला किती चॉकलेट देऊ शकता?

I can give you a few chocolates today.

आज मी तुला काही चॉकलेट देऊ शकतो.

How many of her answers are wrong?

तिची किती उत्तरे चुकीची आहेत?

A few of her answers are wrong.

तिची काही उत्तरे चुकीची आहेत.

How many lessons have you read?

तू किती धडे वाचले आहेत?

I have read a few lessons.

मी काही धडे वाचले आहेत.

How many questions did you solve?

तू किती प्रश्न सोडवलेत?

I solved a few questions.

मी काही प्रश्न सोडवलेत.

Post a Comment

0 Comments