The main Subject should be taken only once. मुख्य कर्ता एकदाच घ्यावा.
Add ing to the base form of an action verb on which another action depends. ज्या क्रियेवर दुसरी क्रिया अवलंबून आहे अशा क्रियेच्या क्रियापदाच्या मूळ रुपास ing जोडावे.
After can be placed at the beginning of a sentence or between two sentences.
After हे वाक्याच्या सुरुवातीला वा दोन वाक्यांच्या मध्ये घेवू शकतो.
Examples:
1. I took my dinner. (take + ing = taking)
मी माझे रात्रीचे जेवण घेतले.
Then I slept for three hours. (Then)
मग मी तीन तास झोपलो.
Ans. After taking my dinner I slept for three hours.
माझे रात्रीचे जेवण करून मी तीन तास झोपलो.
I slept for three hours after taking my dinner.
रात्रीचे जेवण घेतल्यानंतर मी तीन तास झोपलो.
2. After I get back home every night I do all the cooking.
रोज रात्री घरी आल्यानंतर मी सर्व स्वयंपाक करते.
Ans. After getting back home every night I do all the cooking.
रोज रात्री घरी आल्यानंतर मी सर्व स्वयंपाक करते.
I do all the cooking after getting back home every night.
मी सर्व स्वयंपाक रोज रात्री घरी आल्यावर करते.
3. My father looked at the report card. माझ्या वडिलांनी रिपोर्ट कार्ड पाहिले. He became very happy. ते खूप खुश झाले.
Ans. After looking at the report card my father became very happy.
रिपोर्ट कार्ड बघून माझे वडील खूप खुश झाले.
My father became very happy after looking at the report card.
माझे वडील रिपोर्ट कार्ड बघून खूप खुश झाले.
4. After we had finished our dinner, we went out for a walk.
रात्रीचे जेवण उरकून आम्ही फिरायला निघालो.
Ans. After finishing our dinner, we went out for a walk.
रात्रीचे जेवण उरकून आम्ही बाहेर फिरायला बाहेर पडलो.
We went out for a walk after finishing our dinner.
आम्ही फिरायला रात्रीचे जेवण उरकून बाहेर पडलो.
5. Urvi heard the good news. उर्वीने आनंदाची बातमी ऐकली. She started dancing. ती नाचू लागली.
Ans. After hearing the good news Urvi started dancing. आनंदाची बातमी ऐकून उर्वी नाचू लागली.
Urvi started dancing after hearing the good news.
उर्वी आनंदाची बातमी ऐकून नाचू लागली.
0 Comments