Returning Home – घरी परतताना
1. I leave the office. मी ऑफिसमधून निघते.2. I walk towards the bus stop. मी बस स्टॉपच्या दिशेने चालत जाते.
3. I wait for the bus. मी बसची वाट पाहते.
4. I get on the bus. मी बसमध्ये चढते.
5. I find a seat. मी बसण्यासाठी जागा शोधते.
6. I sit near the window. मी खिडकीजवळ बसते.
7. I look outside. मी बाहेर पाहते.
8. I check my phone. मी माझा फोन तपासते.
9. I call my family. मी माझ्या कुटुंबीयांना फोन करते.
10. I get off the bus. मी बसमधून उतरते.
11. I buy vegetables and fruits from the market on my way home. मी घरी येताना बाजारातून भाज्या आणि फळे घेऊन येते.
12. I walk towards home. मी घराच्या दिशेने चालत जाते.
13. I reach home. मी घरी पोहोचते.
14. I unlock the door. मी दरवाजाचे कुलूप उघडते.
15. I enter the house. मी घरात प्रवेश करते.
16. I change my clothes. मी कपडे बदलते.
17. I wash my hands and feet. मी हात-पाय धुते.
18. I freshen up. मी फ्रेश होते.
19. I have a cup of tea. मी एक कप चहा घेते.
20. I relax for a while. मी थोडा वेळ आराम करते.
21. I start preparing dinner. मी रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू करते.

0 Comments