Subscribe Us

HAS

एखादी गोष्ट आपल्या जवळ आहे असे सांगण्यासाठी has या क्रियापदाचा वापर केला जातो.

He/She/It  +  has

He has.  त्याच्याजवळ आहे.

She has.  तिच्याजवळ आहे.

Swarupa has.  स्वरुपाच्याजवळ आहे.

My friend has.  माझ्या मित्राजवळ आहे.

My neighbour has.  माझ्या शेजाऱ्याजवळ आहे.

Her mother has.  तिच्या आईजवळ आहे.

It has.  त्याच्याजवळ आहे.

This door has.  ह्या दरवाजाला आहे.

Our building has.  आमच्या इमारतीला आहे.

Examples:

He has a new mobile. त्याच्याजवळ एक नवीन मोबाईल आहे.

She has a wrist watch.  तिच्याजवळ एक मनगटी घड्याळ आहे.

Sayli has ten pencils.  सायलीच्याजवळ दहा पेन्सिल्स आहेत.

It has two doors. त्याला दोन दरवाजे आहेत.

Our classroom has two doors.  आमच्या वर्गखोलीला दोन दरवाजे आहेत.

Our school has four floors.  आमच्या शाळेला चार मजले आहेत. आमची शाळा चार मजली आहे.

Our building has two lifts. आमच्या इमारतीला दोन लिफ्टस आहेत.

It has four legs. त्याला चार पाय आहेत. ते चारपायी आहे.

एखादी गोष्ट आपल्या जवळ नाही आहे असे सांगण्यासाठी have nothasn't घेतले जाते.

He hasn't.  त्याच्याजवळ नाही आहे.

She hasn't.  तिच्याजवळ नाही आहे.

Swarupa hasn't. स्वरुपाजवळ नाही आहे.

It hasn't. त्याच्याजवळ नाही आहे.

This door hasn't.  ह्या दरवाजाला नाही आहे.

Our building hasn't.  आमच्या इमारतीला नाही आहे.

Examples:

He hasn't a new mobile. त्याच्याजवळ नवीन मोबाईल नाही आहे.

She hasn't a wrist watch. तिच्याजवळ मनगटी घड्याळ नाही आहे.

Sayli hasn't ten pencils. सायलीजवळ दहा पेन्सिल्स नाही आहेत.

It hasn't two doors. त्याला दोन दरवाजे नाही आहेत.

Our classroom hasn't two doors. आमच्या वर्गाला दोन दरवाजे नाही आहेत.

Our school hasn't four floors. आमच्या शाळेला चार मजले नाही आहेत.

It hasn't four legs. त्याला चार पाय नाही आहेत.

Post a Comment

0 Comments