Subscribe Us

POSITIVE DEGREE - 1

तुलना करण्याच्या Positive Degree म्हणजे समभाव, Comparative Degree म्हणजे तर भाव, व Superlative Degree म्हणजे तम भाव या तीन पद्धती आहेत.

Positive Degree

विशेषणाचे मूळ रूप हे दोन व्यक्ती, दोन वस्तूमधील वा दोन गटांतील समानता सांगण्याकरिता तसेच एक गोष्ट दुसऱ्या गोष्टी इतकी नाही आहे असे सांगण्याकरिता तसेच एखादी गोष्ट इतर कोणत्याही गोष्टी इतकी नाही आहे असे सांगण्याकरिता तसेच काही थोड्याच गोष्टी ह्या त्या गोष्टी इतक्या आहेत असे सांगण्याकरिता तसेच एखाद्याची कृती दुसऱ्याच्या कृती इतकीच आहे वा त्याच्या कृती इतकी नाही आहे असे सांगण्याकरिता वापरले जाते.

big, cheap, clean, clever, easy, fast, great, happy, heavy, high, lucky, old, rich, short, slow, small, smart, strong, sweet, tall, ugly, weak, young, beautiful, good, handsome, popular, famous, intelligent, delicious अशी मूळ विशेषणे व क्रियाविशेषणे घेवून त्यांच्या पूर्वी as वा so व त्यांच्यानंतर as अशी शब्दरचना करावी लागते. 

जसे as fast as, वा so fast as, as clever as वा so clever as

इथे आपण fast हे क्रियाविशेषणाचे मूळ रूप व clever विशेषणाचे मूळ रूप घेतले आहे.

आपण दोन व्यक्तींना घेवून positive degree चे वाक्य तयार करूया. 

त्रिषा व कृषी या दोघी मुली सारख्याच उंचीच्या आहेत. जर तुम्हाला त्रिषा कृषी एवढीच उंच आहे असे म्हणायचे आहे. म्हणजेच दोघी सारख्याच उंचीच्या आहेत.असे सांगायचे असेल तर वाक्याची सुरुवात त्रिषाने करून घेवूया. इथे वर्तमान काळ असल्याने वर्तमान काळात बोलायचे असल्याने त्रिषा नंतर is हे क्रियापद घेवूया.

इथे आपल्याला उंच या अर्थाने tall हे विशेषण घ्यायचे आहे. tall च्या अगोदर व tall नंतर as घ्यायचे आहे. 

as...as चा अर्थ आहे च्या इतकाच्या इतकी, च्या इतके. as tall as घेतल्यावर इथे आपण कृषी सोबत तुलना केल्याने as tall as नंतर कृषीला घ्यावे. आपल्याला त्रिषा व कृषी सारख्याच उंच आहेत असे सांगायचे आहे. म्हणून आपण as tall as घेतले आहे. आता आपले Trisha is as tall as Krushi. त्रिषा कृषी इतकी उंच आहे. ही दोघांमध्ये केलेली तुलना समान आहे हे सांगण्यासाठी वाक्य तयार झाले आहे.

आपण त्रिषा कृषी इतकी उंच आहे असे बोलतो तसेच त्रिषा कृषी इतकी उंच नाही असेही बोलतो. इथे त्रिषा ही मुलगी ह्या दुसऱ्या मुलीपेक्षा कमी उंचीची आहे. म्हणजे इथे दोघींच्या उंचीत फरक दिसतोय. उंची मध्ये समानता दिसत नाही. या वाक्यात कृषी त्रिषा पेक्षा उंच आहे हे लक्षात येते. पहिले वाक्य जसे तयार केले तसेच तयार करायचे आहे. फक्त फरक दाखवण्यासाठी आपल्याला पहिल्या as पूर्वी not घ्यायचे आहे. मग आपले Trisha is not as tall as Krushi. त्रिषा krushi इतकी उंच नाही आहे. असे वाक्य तयार होईल.

पहिल्या वाक्यामध्ये त्रिषा व कृषी यांची उंची सारखीच आहे असे आपण सांगतो. व दुसऱ्या वाक्यामध्ये त्रिषा कृषी इतकी उंच नाही असे आपण सांगतो.

म्हणजेच दोन व्यक्तींचे, दोन गोष्टींचे समान विशेष सांगायचे असतील तर च्या इतके, च्या इतका, च्याइतकी या अर्थाने as वा so + adjective + as व फरक सांगायचा असेल तर च्या इतके नाही, च्या इतका नाही, च्या इतक्या नाही या अर्थाने not as वा not so + adjective + as या स्वरूपात सांगावे.

Post a Comment

0 Comments