Subscribe Us

TO BE - 'ARE' - YOU ARE - 4

You' हे सर्वनाम समोर असलेल्या एका व्यक्तीला उद्देशून 'तू' या अर्थाने तसेच एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी 'तुम्ही' या अर्थाने घेतले जाते.

be (बी) - असणे | are हे क्रियापद असून ते to be चे वर्तमानकाळी रुप आहे. 

वर्तमानकाळात You या कर्त्याबरोबर 'be' या क्रियापदाचे are हे रुप घेतले जाते. 

You are म्हणजे 'तू आहेस' 'तुम्ही आहात'.

तू कोण आहेस? तुम्ही कोण आहात? तू काय आहेस? तुम्ही काय आहात?

तू कसा आहेस? तुम्ही कसे आहात? तू कोठे आहेस? तुम्ही कोठे आहात?

तुझे|तुमचे इतर व्यक्तींशी नाते सांगण्यासाठी वापर

Examples :

You are on the terrace. तुम्ही टेरेसवर आहात. You are his sisters. तुम्ही त्याच्या बहीणी आहात. 

You are her daughters. तुम्ही तिच्या मुली आहात. You are his brothers. तुम्ही त्याचे भाऊ आहात.

You are his friends. तुम्ही त्याच्या मैत्रिणी आहात.You are her aunts. तुम्ही तिच्या मावशा आहात.

You are her neighbours. तुम्ही तिच्या शेजारणी आहात. You are busy now. तुम्ही आता व्यस्त आहात.

You are her teachers. तुम्ही तिच्या शिक्षिका आहात. You are a boy. तू एक मुलगा आहेस.

You are his classmates. तुम्ही त्याचे वर्गमित्र आहात. You are a baker. तू एक पाववाला आहेस.

You are a beggar. तू एक भिकारी आहेस.You are a blacksmith. तू एक लोहार आहेस.

You are a broker. तू एक दलाल आहेस. You are a builder. तू एक विकासक आहेस.

You are a carpenter. तू एक सूतार आहेस. You are a cashier. तू एक रोखपाल आहेस.

You are a chemist. तुम्ही औषध विक्रेते. You are a clerk. तू एक कारकून आहेस.

You are a conductor. तू एक वाहक आहेस. You are a controller. तू एक नियंत्रक आहेस.

You are a compounder. तुम्ही कंपाऊंडर आहेस. You are a coolie. तू एक हमाल आहेस .

You are a cook. तू एक आचारी आहेस. You are a cobbler. तू एक चांभार आहेस.

You are a doctor. तू एक वैद्य आहेस. You are a dentist. तू एक दंतवैद्य आहेस.

You are a driver. तू एक चालक आहेस. You are a dietitian. तू एक आहारतज्ञ आहेस.

You are a farmer. तू एक शेतकरी आहेस. You are a fisherman. तू एक कोळी आहेेस.

You are a fruit seller. तू एक फळ विक्रेते आहेस. You are a gardener. तू एक माळी आहेस.

You are a girl. तू एक मुलगी आहेस. You are a hawker. तू एक फेरीवाला आहेस.

You are a jeweller|goldsmith. तू एक सोनार आहेस.

Post a Comment

0 Comments