Subscribe Us

TO BE - IS - HE IS - 1

He म्हणजे तो.

be (बी) - असणे | is हे क्रियापद to be चे वर्तमानकाळी रुप आहे. 

वर्तमानकाळात He या कर्त्याबरोबर 'be' या क्रियापदाचे 'is' हे रुप घेतले जाते. 

He is म्हणजे 'तो आहे', तो कोण आहे? तो काय आहे? तो कसा आहे?तो कोठे आहे?

त्याचे इतर व्यक्तींशी नाते सांगण्यासाठी वापर.

Examples :

He is a baker. तो एक पाववाला आहे. He is a beggar. तो एक भिकारी आहे.

He is a blacksmith. तो एक लोहार आहे. He is a boy. तो एक मुलगा आहे.

He is a broker. तो एक दलाल आहे. He is a builder. तो एक विकासक आहे.

He is a carpenter. तो एक सूतार आहे. He is a cashier. तो एक रोखपाल आहे.

He is a chemist. तो एक औषध विक्रेता आहे. He is a clerk. तो एक कारकून आहे.

He is a conductor. तो एक वाहक आहे. He is a controller. तो एक नियंत्रक आहे.

He is a compounder. तो एक कंपाऊंडर आहे. He is a coolie. तो एक हमाल आहे.

He is a cook. तो एक आचारी आहे. He is a cobbler. तो एक चांभार आहे.

He is a doctor. तो एक वैद्य आहे. He is a dentist. तो एक दंतवैद्य आहे.

He is a driver. तो एक चालक आहे. He is a dietitian. तो एक आहारतज्ञ आहे.

He is a farmer. तो एक शेतकरी आहे. He is a fisherman. तो एक कोळी आहे.

He is a fruit seller. तो एक फळ विक्रेता आहे. He is a gardener. तो एक माळी आहे.

He is a hawker. तो एक फेरीवाला आहे. He is a jeweller. तो एक सोनार आहे.

He is a joker. तो एक विदूषक आहे. He is a judge. तो एक न्यायाधीश आहे.

He is a juggler. तो एक मदारी आहे. He is a lawyer. तो एक वकील आहे.

He is a leader. तो एक नेता आहे. He is a magician. तो एक जादूगार आहे.

He is a mason. तो एक गवंडी आहे. He is a merchant. तो एक व्यापारी आहे.

He is a milkman. तो एक गवळी आहे. He is a musician. तो एक संगीतकार आहे.

He is a manager. तो एक व्यवस्थापक आहे. He is a pilot. तो एक वैमानिक आहे.

He is a newspaper seller. तो एक वर्तमानपत्र विक्रेता आहे.

He is a painter. तो एक रंगारी आहे. He is a patient. तो एक रुग्ण आहे.

He is a pedlar. तो एक किरकोळ विक्रेता आहे. He is a peon. तो एक शिपाई आहे.

He is a player. तो एक खेळाडू आहे. He is a psychiatrist. तो एक मानसोपचारतज्ज्ञ आहे.

He is a psychologist. तो एक मानसशास्त्रज्ञ आहे. He is a postman. तो एक पोष्टमन आहे.

He is a publisher. तो एक प्रकाशक आहे. He is a good reader. तो एक चांगला वाचक आहे.

He is a receptionist. तो एक स्वागतक आहे. He is a sailor. तो एक खलाशी आहे.

He is a scientist. तो एक वैज्ञानिक आहे. He is a security guard. तो एक सुरक्षा रक्षक आहे.

He is a servant. तो एक नोकर आहे. He is a shopkeeper. तो एक दुकानदार आहे.

He is a soldier. तो एक सैनिक आहे. He is a social worker. तो एक समाज सेवक आहे. 

He is a student. तो एक विद्यार्थी आहे. He is a sweeper. तो एक सफाई कामगार आहे.

He is a tailor. तो एक शिंपी आहे. He is a teacher. तो एक शिक्षक आहे.


Post a Comment

0 Comments