Asking for information about something - What? काय?
What can I do now? मी आता काय करु?
What should I wear now? मी आता काय घालू?
What caused this confusion? हा गोंधळ कशामुळे झाला?
What makes you think like this? तुला असे कशामुळे वाटते?
What made you think like this? तुला असे कशामुळे वाटले?
What sort of music do you like? तुला कसले संगीत आवडते?
What else can I say? मी आणखीन काय म्हणू शकतो?
What have you? तुझ्याजवळ काय आहे?
What has he given you? त्याने तुला काय दिलेले आहे?
What did you keep into the bag? तू पिशवीत काय ठेवलेस?
What have you to say about this matter? ह्या गोष्टींविषयी तुझे काय म्हणणे आहे?
What have you to tell me? तुला मला काय सांगायचे आहे?
What's your intention to do? तुझ्या मनात काय करायचे आहे?
What else do you want to speak? आणि तुला काय बोलावयाचे आहे?
What do you want more? तुला आणखी काय पाहिजे?
What is the use of these complaints? ह्या तक्रारी काय कामाच्या?
What is the price of this shirt? ह्या शर्टची काय किंमत आहे?
What was the price of that shirt? त्या शर्टची काय किंमत होती?
What must be the original price of this sofa? ह्या सोफ्याची मूळ किंमत काय असेल?
What is the present rate of onions? हल्ली कांद्याचा काय भाव आहे?
What is your opinion about this thing? ह्या गोष्टींविषयी तुझे मत काय आहे?
What is your mother's opinion about this thing? ह्या गोष्टींविषयी तुझ्या आईचे मत काय आहे?
What is the meaning of these words? ह्या शब्दांचा अर्थ काय आहे?
What was the meaning of those words? त्या शब्दांचा अर्थ काय होता?
What do they do in the evening? ते संध्याकाळी काय करतात?
What are you suffering from? तुम्हाला काय त्रास होत आहे?
What do you know about such matters? अशा गोष्टींबद्दल तुला काय माहित आहे?
0 Comments