Rinki : Well, I like my food to be tasty. बरं, मला माझे जेवण चविष्ट असलेले आवडते.
Artika : But what about the health aspect? पण आरोग्याच्या बाबतीत काय?
Rinki : We only live once. आपण फक्त एकदाच जगतो. So I like to eat whatever I want. त्यामुळे मला हवे ते खायला आवडते. I never fall sick, do I? मी कधीच आजारी पडत नाही, हो ना?
Artika : That's what you are saying now. तू आता तेच म्हणत आहेस. But all the food you are eating is junk. परंतु तू जे अन्न खात आहेस ते जंक फूड आहे. It is bad for your stomach. ते तुझ्या पोटासाठी वाईट आहे. You are making junk food a habit. तू जंक फूडची सवय करत आहेस. You will suffer in later years. नंतरच्या वर्षांत तुला त्रास होईल.
Rinki : Then what do you recommend I eat? मग तू मला काय खाण्याचा सल्ला देतेस?
Artika : Have green salad or a plate of upma, idlis. हिरवी कोशिंबीर किंवा एक थाळी उपमा, इडली खा. Eat leafy vegetables. पालेभाज्या खा. Have fresh fruits. ताजी फळे खा. Have vegetable soup. भाज्यांचे सूप घे. It is much more healthy. ते जास्त निरोगी आहे. You will lose your stamina and have all kinds of stomach related diseases. तुझी सहनशक्ती कमी होईल आणि पोटाशी संबंधित सर्व प्रकारचे आजार होतील. You will put on your weight too. तूझे वजनही वाढेल.
Rinki : Well, let's see. बरं, बघूया. I will try to change my food habits. मी माझ्या खाण्याच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न करेन.
Artika : You should change your lifestyle, if you want to live a long and healthy life. तुला दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर तुला तुझी जीवनशैली बदलणे आवश्यक आहे.
Rinki : Thank you so much dear. खूप खूप धन्यवाद सखी.
Artika : Take care. काळजी घे.
0 Comments