Being our class teacher he usually engages us in the first period everyday. आमचे वर्गशिक्षक असल्याने ते सहसा आम्हाला पहिल्या तासिके मध्ये रोज गुंतवून ठेवतात. After the school prayer he takes our roll call. शाळेच्या प्रार्थनेनंतर ते आमची हजेरी घेतात. He keeps a record of our progress in all the subjects. ते सर्व विषयांतील आमच्या प्रगतीची नोंद ठेवतात. He prepares the result cards after every unit test. ते प्रत्येक घटक चाचणी नंतर निकालपत्रे तयार करतात. He maintains regular contact with our parents and discusses our problems and progress with them. ते आमच्या पालकांशी नियमित संपर्क ठेवतात आणि आमच्या समस्या आणि प्रगती बद्धल त्यांच्याशी चर्चा करतात. He guides those amongst us who are weak in studies. आपल्यातील जे अभ्यासात कमकुवत आहेत त्यांना ते मार्गदर्शन करतात. He encourages us. ते आम्हाला प्रोत्साहन देतात.
He helps his students to improve in every way. आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रकारे सुधारण्यास मदत करतात. He himself is punctual and disciplined. ते स्वतः वक्तशीर आणि शिस्तप्रिय आहेत. We dare not skip periods or avoid homework. आम्ही तासाला न बसण्याचे किंवा गृहपाठ टाळण्याचे धाडस करत नाही. He takes interest in our physical well-being. ते आमच्या शारीरिक आरोग्यामध्ये रस घेतात. Our class often leads the whole school in various games and competitions. आमचा वर्ग अनेकदा विविध खेळ आणि स्पर्धांमध्ये संपूर्ण शाळेचे नेतृत्व करतो. And the entire credit for this goes to our class teacher. आणि याचे संपूर्ण श्रेय आमच्या वर्गशिक्षकांना जाते. We all love and respect him. आम्ही सर्व त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांचा आदर करतो.
0 Comments