Subscribe Us

SENTENCES JOINED WITH 'BECAUSE'

1. I lost the match because I played slowly. मी सामना हरलो कारण मी हळू खेळलो.

2. Nisha ate a lot because she was hungry. निशाने खूप खाल्ले कारण तिला भूक लागली होती.

3. I can't play chess because I am sick. मी आजारी असल्यामुळे मी बुद्धिबळ खेळू शकत नाही.

4. Neel began to sing because he got a job. नीलने गाणे सुरू केले कारण त्याला नोकरी मिळाली.

5. I fell down because the step was slippery. पायरी निसरडी असल्याने मी खाली पडलो.

6. I drank the watermelon juice because I was thirsty. मी कलिंगडाचा रस प्यायलो कारण मला तहान लागली होती.

7. Megha jumped and cried because she saw a lizard. मेघाने उडी मारली आणि ओरडली कारण तिला पाल दिसली.

8. Don't sit in the chair because it is broken. खुर्ची तुटलेली असल्यामुळे त्यावर बसू नका.

9. My mother became sad because her sister is ill. माझी आई दुःखी झाली कारण तिची बहीण आजारी आहे.

10. Netra and Suru started clapping because they saw their parents. नेत्रा आणि सुरुने टाळ्या वाजवायला सुरुवात केली कारण त्यांनी त्यांच्या पालकांना पाहिले.

11. It won't rain because there are no dark clouds in the sky. आकाशात काळे ढग नसल्यामुळे पाऊस पडणार नाही.

12. He won't reach there before 9 because he missed his usual train. तो 9 च्या आधी तिथे पोहोचणार नाही कारण त्याची नेहमीची ट्रेन चुकली.

Post a Comment

0 Comments