Subscribe Us

WORDS OFTEN COMING IN PAIRS

WORDS OFTEN COMING IN PAIRS 

above all - सर्वात महत्त्वाचे

Above all, she came to meet me.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती मला भेटायला आली. 

Above all, I got good marks in exam.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला परीक्षेत चांगले गुण मिळाले. 

Above all, he was beat by his father.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला त्याच्या बाबांकडून मारले गेले. 


aches and pains - 

After playing kabaddi, I had aches and pains in my legs. 

कबड्डी खेळल्यानंतर माझ्या पायात वेदना होत होत्या. 

After walking for 5 miles, she had aches and pains in her heels.

5 मैल चालल्यानंतर तिच्या टाचां मध्ये वेदना होत होत्या. 

After writing 20 pages, Himali had aches and pains in her fingers.

20 पाने लिहिल्यानंतर हिमालीच्या बोटांमध्ये वेदना होवू लागल्या. 


again and again - वरचेवर, पुन्हापुन्हा, वारंवार 

I told him again and again, then he changed his behavior.

मी त्याला पुन्हा पुन्हा सांगितले तेव्हा कुठे त्याने त्याचे वर्तन बदलले. 

I explained this lesson her again and again, then she understood it. 

मी तिला हा धडा पुन्हा पुन्हा समजावून सांगितला तेव्हा कुठे तिला तो समजला. 


rise and fall - चढउतार 

After rise and fall of first 2 years, we settled down in Mumbai nicely.

पहिल्या दोन वर्षांच्या चढउतारानंतर आमचा मुंबईत चांगला जम बसला. 

After rise and fall of 6 months, Shweni scored good marks in final exam.

6 महिन्यांच्या चढउतारानंतर श्वेणीने अंतिम परीक्षेत चांगले गुण मिळवले.

After rise and fall of first 5 years, Nima became a famous singer. 

पहिल्या पाच वर्षांच्या चढउतारानंतर निमा एक प्रसिद्ध गायिका बनली. 


all in all - सर्वेसर्वा, सर्वकाही 

I think Meema is all in all in her family.

मीमा तिच्या कुटुंबातील सर्वेसर्वा आहे असे मला वाटते. 

Her father is all in all for her.

तिचे वडिल तिच्यासाठी सर्वकाही आहेत. 

His cricket bat is all in all for him.

त्याची क्रिकेट बॅट ही त्याच्यासाठी सर्वेसर्वा आहे. 


bag and baggage - सर्व सामानसुमानासह 

Nidhi went to Goa with her bag and baggage.

निधी तिच्या सामानसुमानासह गोव्याला गेली. 

He was expelled from the hostel with his bag and baggage. 

त्याला त्याच्या सामानसुमानासह हॉस्टेलमधून हाकलण्यात आले. 

He boarded the train with his bag and baggage. 

सामानसुमानासह तो ट्रेनमध्ये चढला.

 

bread and butter - उपजीविका 

This business is bread and butter for him.

हा व्यवसाय त्याच्या उपजीविकेचे साधन आहे. 

This field is bread and butter for her.

ही जमीन तिच्या उपजीविकेचे साधन आहे. 

Her beauty parlor is bread and butter for her in this age.

ह्या वयात तिचे ब्युटी पार्लर हे तिच्यासाठी उपजीविकेचे साधन आहे.

Post a Comment

0 Comments