1. Soumya is buying two icecreams. सौम्या दोन आईस्क्रीमस विकत घेत आहे.
2. Vibha and Reva are cooking food now. विभा आणि रेवा आता जेवण बनवत आहेत.
या वाक्यांतील is + buy + ing आणि are + cook + ing ही ing युक्त क्रियापदे या वाक्यांतील क्रिया याक्षणी चालू आहेत असे सांगतात.
🟥 Past Continuous Tense अपूर्ण भूतकाळ
1. Soumya was buying two icecreams. सौम्या दोन आईस्क्रीमस विकत घेत होती.
2. Vibha and Reva were cooking food. विभा आणि रेवा जेवण बनवत होत्या.
या वाक्यांतील was + buy + ing आणि were + cook + ing ही ing युक्त क्रियापदे या वाक्यांतील क्रिया त्याक्षणी चालू होती असे सांगतात.
🟥 Future Continuous Tense अपूर्ण भविष्यकाळ
1. Soumya will be buying two icecreams. सौम्या दोन आईस्क्रीमस विकत घेत असेल.
2. Vibha and Reva will be cooking food now. विभा आणि रेवा आता जेवण बनवत असतील.
या वाक्यांतील will be + buy + ing ही ing युक्त क्रियापदे या वाक्यांतील क्रिया त्याक्षणी चालू असतील असे सांगतात.
'ing' प्रत्यय असलेल्या क्रियापदाचा GERUND (जेरन्ड) धातुसाधित नाम म्हणून उपयोग
🟥 GERUND AS SUBJECT धातुसाधित नाम - कर्ता
🟥 Learning foreign languages is her hobby. परदेशी भाषा शिकणे हा तिचा छंद आहे.
या वाक्यात learning हा शब्द learn या क्रियापदाला ing प्रत्यय लावून बनलेला आहे. आणि तो is या क्रियापदाचा Subject (कर्ता) आहे. कर्त्याचे (subject) काम करणारा शब्द Noun (नाम) असतो. म्हणून या वाक्यात learning हा शब्द Noun (नाम) आहे.
क्रियापदाला ing प्रत्यय लावून बनलेल्या व नामाचे काम करणाऱ्या शब्दाला GERUND धातुसाधित नाम वा VERBAL NOUN म्हणतात.
Examples:
1. Walking on the road is a good habit.
2. Getting first prize in folk dance competition made her family happy.
3. Studying computer will get me a good job.
4. Driving a car is not difficult.
5. Counting steps is Vihan's hobby.
6. Lying is a sin.
7. Swimming is a good exercise.
8. Eating junk food is a bad habit.
9. Talking loudly is not allowed in the library.
10. Playing computer games is a waste of time.
🟥 GERUND AS OBJECT धातुसाधित नाम - कर्म
Nivrutti likes learning foreign languages. निवृत्तीला परदेशी भाषा शिकायला आवडते.
या वाक्यातील learning हा शब्द learn या क्रियापदाचे Object (कर्म) आहे.
Nivrutti likes - What? या प्रश्नाचे उत्तर learning हे आहे.म्हणून learning हे like या क्रियापदाचे Object (कर्म) आहे. Object (कर्म) हे Noun (नाम) असते. म्हणून या वाक्यातील learning हा शब्द Noun (नाम) आहे.
कर्माचे (Object) काम करणाऱ्या ing युक्त शब्दाला सुद्धा Gerund धातुसाधित नाम म्हणतात.
Examples:
1. Roma likes going to cinema.
2. Rohini dislikes going to market.
3. Mahi likes sleeping early at night.
4. I like playing chess very much.
5. Triva enjoys knitting.
6. My parents have decided selling this flat.
7. The girl was blamed for losing her purse.
8. Neha liked making greeting cards.
9. I don't like talking to a stranger.
10. Stop criticising others.
0 Comments