Subscribe Us

TOO____TO इतका की..... नाही

too क्रियाविशेषण अर्थ - more than enough - वाजवीपेक्षा जास्त (इतका की)

to + Verb1 सह = क्रियेची असमर्थता व्यक्त करून नकारात्मक भाव दर्शवण्यासाठी वापर

Examples:

1. Mugdha is too fat to run fast. मुग्धा इतकी लठ्ठ आहे की ती जोरात धावू शकत नाही.

या वाक्यातील पहिला too हा more than enough म्हणजे वाजवीपेक्षा जास्त (इतका की) ह्या अर्थाने घेतला आहे. व त्यानंतर run हे to सह घेतलेले क्रियापद कर्त्याची ( Mugdha - Subject कर्ता) जोरात धावण्याची असमर्थता व्यक्त करून नकारात्मक भाव दर्शवते.

2. My dad is too busy to come for a walk. माझे बाबा इतके व्यस्त आहेत की ते फिरायला येणे शक्य नाही.

come हे to सह घेतलेले क्रियापद कर्त्याची (My dad - Subject कर्ता) फिरायला येण्याची असमर्थता व्यक्त करून नकारात्मक भाव दर्शवते.

3. They are too late to reach the bank on time. त्यांना इतका उशीर झाला आहे की त्यांना बँकेत वेळेवर पोहोचणे शक्य नाही.

4. I was too tired to cook food. मी इतकी थकले होते की मला जेवण बनवणे शक्य झाले नाही.

5. He was too late to attend the beginning of the function. त्याला इतका उशीर झाला की तो समारंभाच्या सुरुवातीला उपस्थित राहू शकला नाही.

for me माझ्यासाठी - for us आमच्यासाठी, आपल्यासाठी - for them त्यांच्यासाठी - for you तुझ्यासाठी, तुमच्यासाठी - for him त्याच्यासाठी - for her तिच्यासाठी  - for it त्याच्यासाठी

Tea is too cold for me to drink it. चहा इतका थंड आहे की मी तो पिणे शक्य नाही.

Tea was too cold for me to drink it. चहा इतका थंड होता की मला तो पिणे शक्य नव्हते.

It is too dark for me to see anything on the road. काळोख इतका आहे की मी रस्त्यावरचे काहीही बघू शकत नाही.

This bag is too heavy for her to carry it. हि बॅग इतकी जड आहे की तिला ती सोबत घेणे शक्य नाही.

It is too hot for them to sit outside. बाहेर इतकी उष्णता आहे की ते बाहेर बसू शकत नाहीत.

The novel is too interesting for me to stop reading it. कादंबरी इतकी मजेशीर आहे की मी ती वाचायची थांबवणे शक्य नाही.

These sums are too difficult for him to solve them. ही गणिते इतकी कठीण आहेत की तो ती सोडवणे शक्य नाही. 

The kurti is too beautiful to be cheap. कुर्ती इतकी सुंदर आहे की ती स्वस्त असणे शक्य नाही.

Post a Comment

0 Comments